
बीड, (रिपोर्टर)ः-तब्बल दहा वर्षे बंद असलेल्या आण्णाभाऊ साठे महामंडळ गेल्या वर्षभरापासून अडखळत अडखळत सुरू झाले आहे. या महामंडळाच्या व्यवस्थापीक संचालकपदी सामाजिक जाणीव असलेले छत्रपती संभाजीनगर येथील तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश साठे यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.
प्रा.योगेश साठे यांच्या सामाजिक जाणीव असल्यामुळे महामंडळाच्या वतीने चालविण्यात येणार्या अनेक योजनांना ते गती देतील. तंत्रज्ञान विषयात त्यांनी अनेक शोध निबंध सादर केलेले आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ऊर्जा ऑफ भारत सरकार यांच्याकडून परिक्षेद्वारे त्यांना उर्जा व्यवस्थापक म्हणून मान्यता मिळालेली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या 50 हून अधिक तंत्रज्ञान प्रकल्पावर सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ.योगेश उत्तमराव साठे हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कर्मशाळा व भंडार या विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. साठे यांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवडीमुळे शैक्षणिक कर्जातील सुलभता अधिक सुलभ होईल, या समाजातील छोट्या मोठ्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी साठे हे महत्वाची भुमिका बजावतील असे जाणकरांचे मत आहे.






