बीड (रिपोर्टर) कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हळूहळू वाढू लागली आहे. आरोग्य विभागाला आज सकाळी 656 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्या अहवालात 10 जण पॉझिटिव्ह तर 646 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबाजोगाई 1, बीड 5, केज 1, पाटोदा 2 आणि वडवणी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 2 हजार 877 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.










