
नरेगा विभागात शुकशुकाट
बीड, (रिपोर्टर)ः- शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी असतांनाही आज सोमवारी पंचायत समितीच्या विविध विभागात कर्मचारी फिरकले नव्हते. नरेगा विभागात तर एकच कर्मचारी काम करतांना दिसून येत होता. सीईओने दोनदा बजावूनही कर्मचार्याच्या वर्तनात बदल होत नसल्याचे दिसून येत आहे.
बीड पंचायत समितीमध्ये विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येत असतात विशेष करून नरेगा व इतर विभागात लोकांची गर्दी असते. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी होती आज सोमवार आठवड्यातला पहिला दिवस असतांनाही नरेगा विभागात फक्त एकच कर्मचारी काम करतांना दिसून येत होता. इतर कर्मचारी मात्र कार्यालयाकडे फिरकले नव्हते. सीईओ जितीन रहेमान यांनी दोनदा पं.स कार्यालयात येवून कर्मचार्यांना वेळेवर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही कर्मचार्याच्या वर्तनात बदल होत नसल्याचे दिसून येत आहे. जो पर्यंत कर्मचार्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत कर्मचारी ठिकाणावर येणार नाहीत.








