
दहा लघुप्रकल्प अजुनही कोरडेच, 168 धरणाची पाणी पातळी जोत्याखाली
माजलगावमध्ये 13 तर मांजरा 25 टक्के पाणीसाठा, मराठवाड्यात दमदार पावसाची गरज
बीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यासह महाराष्ट्रात गेली तीन दिवस पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात धो धो तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या तीन दिवसाच्या पावसामध्ये मराठवाड्याच्या धरणाच्या पाणी पातळीत अगदी काही प्रमाणात वाढ झाली. मराठवाड्यातील 879 प्रकल्पात 52 टक्के पाण्याचा साठा जमा झाला. मराठवाड्यातील दहा लघु प्रकल्प अर्जुनही कोरडे असून 168 प्रकल्पातील पाणी साठा जोत्याच्या खाली आहे. मराठवाड्यातील धरणात पाण्याची पातळी वाढण्यासाठी मराठवाड्यात दमदार पावसाची गरज आहे. मराठवाड्यातील काही बोटावर मोजण्या एवढ्या धरणातच मुबलक पाणीसाठा जमा झाला. इतर धरणात मात्र पाण्याचा साठा जमा झालेला नाही.
मराठवाड्यात गेल्या दोन महिन्या कमी स्वरूपात पाऊस पडला. या पावसामुळे मराठवाड्यातील धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. गेली तीन दिवस राज्यात पाऊस झाला. हा पाऊस विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात धो धो बरसला पण मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पडला. मराठवाड्यातील 879 धरणामध्ये फक्त 52 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. विभागातील 11 मोठ्या धरणात 64.12 मध्यम 75 धरणात 32.49 तर लघु 751 धरणात 27.59 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. गोदावरील नदीवरील 15 बंधार्यात 41.71 टक्के तसेच तेरणा, मांजरा, रेणा नद्यावरील 27 बंधार्यात 44.12 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. मराठवाड्यातील 10 लघू प्रकल्प अजुनही कोरडेच आहेत. 168 प्रकल्पातील पाणी साठा जोत्याच्या खाली आहे. मराठवाड्यात आणखी चांगल्या दमदार पावसाची गरज आहे. राज्यातले इतर विभागातील धरणामध्ये पाण्याचा साठा समाधान कारक झाला मात्र मराठवाड्यातील धरणेच मात्र कोरडे आहेत.
मोठ्या 11 प्रकल्पात किती पाण्याचा साठा
जायकवाडी – 81, सिध्देश्वर -34, मांजरा -25, निम्मतेरणा -70, विष्णूपुरी-82, येलदरी -62, माजलगाव -13, पैणगंगा-64, निम्ममनार -53, दुधणा -49 आणि सिन कोळेगावच्या धरणात 52 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे.








