माजलगाव (रिपोर्टर) जायकवाडी धरणातुन कॅनॉलव्दारे येत असलेले पाणी आणि धरण कार्यक्षेत्रात जुन महिण्यांपासुन आजपर्यंत बरसत आलेल्या पावसावर माजलगाव धरणाने पन्नासी ओलांडली असुन आज धरणाचा पाणीसाठा 50.06 टक्के झाला आहे. दरम्यान राज्यात पुढील पाच दिवसात मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी देखिल धरण भरण्यास (पान 7 वर)
मोठ्या पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.
धरणातील जवळपास 60 टक्के पाणी शेतीला सिंचनासाठी दिले जाते तर उर्वरीत पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात येते. मागील तिन वर्षांपासुन सतत धरण भरत आहे परंतु यावर्षी धरण कार्यक्षेत्रात अत्यल्प होत असलेला पावसामुळे धरणात पाण्याची अत्यल्प आवक होत आहे. दरम्यान नाशिक येथे झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण भरले असुन कॅनॉलव्दारे माजलगाव धरणात 24 तासांमध्ये एक दलघमी जायकवाडीचे पाणी येत आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांमध्ये 17.450 दलघमी पाणी आले असुन या पाण्यामुळे धरणाच्या पातळीत एकुण सहा टक्के वाढ जायकवाडी धरणातील पाण्यामुळे झाली आहे तर माजलगाव धरण कार्यक्षेत्रात कमी जास्त प्रमाणात बरसत असलेल्या पावसाच्या पाण्याची देखिल आवक होत असल्याने माजलगाव धरणाच्या पातळीत दोन ते तीन दिवसांत एक टक्यांने वाढ होत आहे. त्यामुळे आज धरणाचा पाणीसाठा 49 टक्यांवर गेला आहे. त्यामुळे बागायतदार शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सप्टेंबर महिणा अखेरीस आणि परतीच्या पावसावर माजलगाव धरण भरण्याची शक्यता आहे. या धरणातील पाण्यावर बीड – परभणी – नांदेड या तिन जिल्ह्यातील शेतीला सिंचनासाठी फायदा होतो तर परळी येथील औष्णीक विद्युत केंद्रालाही पाणीपुरवठा केला जातो.
आकडे बोलतात…
जायकवाडीतुन आलेले
पाणी – 17.450 दलघमी
पाणी येण्यास लागलेला वेळ – 15 दिवस.
24 तासांमध्ये येणारे पाणी – एक दलघमी.
माजलगाव धरणात जायकवाडीच्या पाण्याने झालेली वाढ – सहा टक्के.
माजलगाव धरण सद्यःपरिस्थिती
टक्केवारी – 50.06 टक्के.
पाणी पातळी – 429.52 मिटर.
उपयुक्त पाणीसाठा – 156.20 दलघमी
एकुण पाणीसाठा – 298.20 दलघमी
धरण कार्यक्षेत्रातील एकुण पाउस – 365 मिलीमिटर.