Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड काल पवारांची भेट घेतली, आज गडकरींची आ.क्षीरसागरांची विकास कामांसाठी धडपड

काल पवारांची भेट घेतली, आज गडकरींची आ.क्षीरसागरांची विकास कामांसाठी धडपड


शहरातून जाणार्‍या धुळे-सोलापूर महामार्गाच्या कामाबाबत गडकरींना दिले निवेदन, रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे निर्देश देऊ
-ना. गडकरींचे आ. क्षीरसागरांना आश्‍वासन, जिरेवाडी-जालना रोड-शिवाजी महाराज पुतळा-बार्शीनाका-कोल्हारवाडी या १२ कि.मी.रस्त्याचा होणार कायापालट नुतनीकरण, सुशोभीकरण, स्लिप रोड, सर्व्हिस रोडचे काम लवकरच पुर्ण होणार
बीड (रिपोर्टर)- बीड शहरासह मतदारसंघातील जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता करण्याबाबतची धडपड आ. संदीप क्षीरसागर करत असल्याचे दिसून येत आहे. काल विविध प्रश्‍नांवर राष्ट्रवादीचे सर्वेसवार्र् खा. शरद पवार यांची भेट घेऊन मतदारसंघातल्या अडीअडचणी सांगितल्यानंतर शहरातून जाणार्‍या धुळे-सोलापूर रस्त्याच्या दुर्दशेवर केंद्रीय रस्ते, बांधकाम व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खा. पवारांनी भेट घडवून आणली तेव्हा आ. क्षीरसागरांनी राष्ट्रीय महामार्ग एन.एच. बाबत कोल्हारवाडी, बार्शी नाका,छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिरेवाडी या बारा किलोमीटरच्या रस्त्याचे नुतनीकरण व सुशोभीकरण तसेच शहरालगतच्या बायपासवरील स्लिप रोड व सर्व्हिस रोड तातडीने करण्यात यावे याबाबत सविस्तर निवेदन दिले. या वेळी ना. गडकरी यांनी सविस्तर चर्चा करत सदरचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आश्‍वासन देत संबंधितांना तात्काळ निर्देश देण्याचे आश्‍वासन दिले. यामुळे सदरचे रखडत पडलेले काम आता संदीप क्षीरसागरांमुळे तात्काळ मार्गी लागणार आहे.


बीड शहरालगत बायपास झाल्यानंतर शहरातून जाणार्‍या धुळे-सोलापूर रस्त्याचे काम मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित होते. याआधी सातत्याने कामाची मंजूरी झाली, काम आता होणार अशा अनेक बातम्या यायच्या. आता मात्र संदीप क्षीरसागर यांनी जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची जाण ठेवत ते कामे प्रगतीपथावर जावेत म्हणून पाठपुरावा करत असल्याने शहरासह मतदार-संघातील कामे जलदगतीने होत आहेत. आ. क्षीरसागरांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची भेट घेऊन मतदार-संघातल्या अडीअडचणी सांगितल्या त्याचबरोबर बीड शहरातून जाणार्‍या धुळे-सोलापूर महामार्गावरील जीरेवाडी, जालना रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कोल्हारवाडी या १२ कि.मी.च्या रस्त्याचे काम, रस्ता सुधारणा, सुशोभीकरण, नुतनीकरण, स्लिप रोड, सर्व्हिस रोडचे अद्याप काम झालेले नाही. याबाबत खा. पवारांनी संदीप क्षीरसागरांची थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घडवून आणली. आज सकाळी आ. क्षीरसागरांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत सविस्तर निवेदन दिले. या वेळी गडकरी यांनीही विकास कामे जलदगतीने व्हावेत, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सदरचे काम हे लवकरात लवकर तातडीने मार्गी लावण्याबाबतचे निर्देश देऊ असे आश्‍वासन दिले. आ. क्षीरसागरांनी सदरच्या प्रश्‍नाचा पाठपुरावा करत राहिल्यामुळे येत्या काही दिवसात जिरेवाडी ते कोल्हारवाडी या शहरातून जाणार्‍या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. आ. क्षीरसागर विकास कामासाठी धडपडत असून जनतेला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पुर्तता करण्यासाठी ते सातत्याने वरिष्ठ मंत्र्यांच्या संपर्कात राहताना दिसून येत आहेत.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....