Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड ना. धनंजय मुंडे यांच्या निर्णयाने राखीव जागेवर निवडणूक लढवणा-या उमेदवारांना दिलासा

ना. धनंजय मुंडे यांच्या निर्णयाने राखीव जागेवर निवडणूक लढवणा-या उमेदवारांना दिलासा

आज व उद्या म्हणजेच २९ व ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे सर्व जात पडताळणी समित्यांना निर्देश

पुणे —- : ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टीमार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती व तक्रारी करणारे फोन मेसेज येत होते, त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दोन्ही दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि. ०१ जानेवारी पर्यंत बार्टीकडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...