
बीड (रिपोर्टर): अनुसूचीत जाती आयोगाकडील प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी फुलेपिंपळगाव येथील नागरीक जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. खोटे कागदपत्र तयार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांची आहे.
खोटे कागदपत्र तयार करणार्या शेख मंजूर याच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी फुलेपिंपळगाव येथील मनोज साळवे व इतरांनी वेळोवेळी केली मात्र याची दखल पोलीस प्रशासन घेत नसल्याने आजपासून नागरीक जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेले हे सर्व गायरान धारक आहेत.








