
परळी वैजनाथ (रिपोर्टर): परळी शहरातील 25 वर्षीय वर्षीय युवक तालुक्यातील पांगरी येथे सिमेंट काँक्रीट मिक्सरवर काम करणार्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि 16 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास घडली.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार परळी शहरातीलअमेर अजमेर पठाण (वय 25 वर्ष रा बरकतनगर) मिक्सर ऑपरेटर पांगरी येथील काम करत असताना अचानक कशाचा तरी धक्का लागून नदी पात्रात पडून नदी पात्रात आलेल्या पाण्यात वाहून गेला. सदरील घटना शनिवार दि 16 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास घडली असून मयत व्यक्तीचे पार्थिव हे उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणले आहे.शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत अमेर पठाण हे विवाहित असून त्यांना 2 अपत्य असल्याचे समजले असून त्याच्या या अपघाती निधनाने बरकत नगर परिसरात शोककळा पसरली आहे.








