
रोख रक्कमेसह चार लाखांचा साहित्य जप्त
बीड, (रिपोर्टर)ः- अंबाजोगाई शहरातील शेफवाडी नजीक एका पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार चालु असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये रोख रक्कम 93,000,मोबाईल आणि मोटार सायकल असा एकुण 4 लाख 7 हजार 300 रूपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
शेफवाडी परिसरातील योगेश शेप यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा पत्त्याचा जुगार चालु होता. या ठिकाणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. शरद जोगदंड, सहाय्यक पो.नि. कांबळे, पो.उप.निरिक्षक आनंद शिंदे यांच्या पथकाने या पत्र्याच्या शेडवर धाड टाकली असता त्या ठिकाणी अजिंक्य कदम, धनराज चाटे, योगीराज शेप आणि लक्ष्मण शेप सर्व रा. अंबाजोगाई शहरातील असुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील रोख रक्कम मोबाईल आणि मोटारसायकल जप्त करून त्यांच्यावर कलम 12 अ, महाराष्ट्र जुगार प्रतिंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.








