
भाऊजीने मेहुण्याची केली कोयत्याने हत्या
आरोपी फरार, परिसरात तणावाचे वातावरण
परळी, (रिपोर्टर)ः- घरगुती कारणावरून एका 26 वर्षीय तरूणाच्या डोेक्यात कोयत्याने वार करून त्याला जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना परळी तालुक्यातील रत्ननगर तांडा येथे घडली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला असून घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणला होता. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत हा आरोपीचा नात्याने मेहुणा आहे.
अनिल चव्हाण आणि भिमराव राठोड हे दोघे मेहुणे आहेत. यांच्यामध्ये घरगुती वाद होता. हा वाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू होता. अनिल चव्हाण याने याच वादातून भिमरावला संपविण्याचा कट रचला. अनिलने भिमरावला रत्ननगर तांडा, जळगव्हाण येथे बोलावून घेतले. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्याचे रूपांतर हाणामारीत होवून अनिलने आपल्या जवळ असलेल्या कोयत्याने भिमरावच्या डोक्यात गंभीर वार केले. यामध्ये गंभीर रित्या जखमी होवून भिमराव राठोड हा जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण फरार झाला. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात आणण्यात आला होता.या प्रकरणी आरोपी विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयताची बहीण आरोपीला दिलेली आहे. त्यामुळे हे दोघे नात्याने मेहुणे आहेत. मयत हा पुणे येथे राहत असे. काही कामानिमित्त तो गावाकडे आला होता. त्यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
तांडा परिसरात तणावाचे वातावरण
या हत्येच्या घटनेमुळे रत्ननगर तांडा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरीक आणि शेजारी घटनेमुळे घाबरून गेले आहेत. पोलिसांनी येथील नागरीकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी अधिक पोलीस बळ तैनात केले. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सखोल तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी सीसीटिव्ही फुटेज, शेजार्यांचे जबाब आणि मोबाईल लोकेशन यांचा आधार घेतला आहे तसेच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हातळत अनिल चव्हाणला लवकर पकडण्यात येईल असे सांगितले आहे.
ReplyReply allForwardAdd reaction






