
आष्टी (रिपोर्टर):- एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आष्टी तालुक्याच्या बीड सांगवीमध्ये शुक्रवारी पहाटे दि.22 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिकमृत्यूची नोंद करण्यात आली.याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अविनाश बापू दिवटे असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे.
बीड सांगवी येथे राहणार्या अविनाश बापू दिवटे या 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन जिवन संपवले आहे.पडवीमध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या अवस्थेत दिसून आला.या घटनेची माहिती मयताच्या नातेवाईकांनी आष्टी पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर ,पोलीस हवालदार गणेश जगताप, बब्रुवाण वाणी,पो.ह.विकास जाधव आदींनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. या घटनेची नोंद आष्टी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही पुढील तपास पो.ह.विकास जाधव हे करत आहेत.





