Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home देश विदेश कॉंग्रेस नेते, माजी गृहमंत्री बुटा सिंह यांचं निधन

कॉंग्रेस नेते, माजी गृहमंत्री बुटा सिंह यांचं निधन


नवी दिल्ली (वृत्तसेवा)- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुटा सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. पंजाबच्या जालंधरमधील मुस्तफापूर गावात जन्मलेले बूटा सिंग ८ वेळा लोकसभेचे खासदार होते. पंजाबमधील प्रमुख दलित नेता म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
राजीव गांधी पंतप्रधान असताना वर्ष १९८६ ते १९८९ पर्यंत राजीव गांधी सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. याआधी त्यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये १९८४ ते १९८६ पर्यंत त्यांनी कृषिमंत्री म्हणून कारभार पाहिला. याशिवाय २००४ ते २००६ पर्यंत बूटा सिंग बिहारचे राज्यपाल देखील होते. २००७ ते २०१० या काळात त्यांनी मनमोहनसिंग सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....