Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home कोरोना कोरोना लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ला सुरुवात

कोरोना लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ला सुरुवात

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली पाहणी

जालना (रिपोर्टर)- संपूर्ण जगाला विखळा घातलेल्या कोरोना विषाणूवर लवकरच लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण कसे करावे, यासाठी शासनाकडून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. यामध्ये जालना जिल्हा कोव्हिड रूग्णालय येथे शनिवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनला सुरवात करण्यात आली.


यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्यक डॉ. अर्जना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खादगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी तयार करण्यात आलेल्या वार्डासह तयारीची पाहणी केली.त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना टोपे म्हणाले की, कोरोनाची लस आल्यानंतर तरी विशिष्ट तापमानामध्ये शितगृहात ठेवली जाईल. त्यानंतर प्रशिक्षक नर्सव्दारे कोरोना लस ही नागरिकांच्या दंडामध्ये सिरीनव्दारे देण्यात येईल. कोरोनाची लस दिल्यानंतर त्या नागरिकाला काही त्रास होत आहे का ? हे जाणून घेण्यासाठी काही काळ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निगरानीमध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती श्री. टोपे यांनी दिली.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...