
गेवराईत शिवाजीराव दादा पंडित अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
गेवराई (रिपोर्टर) शिवाजीराव दादा पंडित यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रात भरीव काम केले. मंत्री असताना रोजगार हमी काहते त्यांनी यशस्वीपणे सांभाळत असताना या योजनेला विरोध असताना त्यांनी राज्यभरात चांगले काम केले. त्याचबरोबर सहकार क्षेत्र व ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारून आपल्या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी भरीव काम केले असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांनी केले.

गेवराई येथील शिवनगरी मैदानात आज माजी राज्यमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.ना. राजन पाटील, ह.भ.प.शिवाजी महाराज नारायणगडकर, हभप महादेव म.चाकरवाडीकर, माजी आमदार विलासराव खरात, मा.आ. अमरसिंह पंडित यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, 88 वर्ष वय झाले असतानाही दादा आज तीच ऊर्जा घेऊन काम करत आहेत. म्हणून शिवाजीराव दादा यांची शताब्दी याच ठिकाणी साजरी व्हावी व या कार्यक्रमाला माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ हजर राहून त्यांना सदिच्छा मिळाव्यात असे उदगार त्यांनी काढले. शिवाजीराव दादा चा राजकीय परिचय म्हणजे मी गेल्या 50 ते 60 वर्षांपासून त्यांची कारकीर्द पाहत आलो आहे. दादा राजकारणात आले आणि गेवराई तालुक्याचा कायपालट केला. दादांनी 40 वर्षाच्या राजकारणात विविध विकास कामे आणून गेवराई तालुक्याचा तर विकास केलाच पण मराठवाड्याच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजही दादांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मुलं या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय काम करत असून त्यांचा यशस्वी वारसा चालवत आहेत.
1962 साली दादा धोंडराई मधून पहिली जिल्हा परिषद निवडणूक जिंकले. त्यानंतर दादा 1972 ला मदळमोही मधून निवडून येऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. सहकार क्षेत्रात दादांचे मोठे काम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादांनी गेवराई तालुक्यातील शेतकर्यांना ऊसाची क्षेत्र वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मराठवाड्यात सहकार क्षेत्रात आदराने दादांचे नाव घेतले जाते. शिक्षण क्षेत्रातही दादांचे मोठे येगदान आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दादांनी शिक्षण संस्थाचे जाळे निर्माण करून शेतकर्यांची मुले साक्षर केले.

शिवाजीराव दादा मंत्री आसतांना मी पण सभागृहात होतो. त्यांनी रोजगार हमी खात यशस्वीपणे सांभाळले त्याकाळी अनेकांनी या खात्यावर टीका टिपण्णी केली. परंतु या खात्यातून ग्रामीण भागातील जेवढा विकास झाला तेवढा विकास कोणत्याच खात्यातून झाला नाही. या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते झाले, पाझर तलाव झाले. अन त्याच काळात झालेल्या जलसंधारणाची कामे आज राज्यातील अनेक भागात सुपीकता दिसून येत आहे. मराठवाड्यातून वाहणार्या कालव्यातही दादांचा मोठा वाटा आहे.

राजकारणातील स्वच्छ चरित्र अन चांगली प्रतिमा असलेल्या नेत्याममध्ये दादांचे नाव अग्रक्रमाने येत आहे.
राजकीय निवडणुकीतही दादांनी कधी कोणाचा द्वेष न करता एकोप्याने राजकारण केले. दरम्यान यावेळी महिलांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती सांभाळण्याचे काम महिलांनी केली. जगातल्या अनेक संस्कृती मेल्या परंतु भारतीय संस्कृती अजूनही अबाधित आहे. हे सांभाळण्याचे खरे काम आमच्या माता भगिनींनी केलं असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शेवटी दादांना उदंड अन निरोगी आयुष्य लाभावे आशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या कार्यक्रमात गेवराई तालुक्यातील सर्व संत महंतांचा जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.विजयसिंह पंडित यांनी केले. तर शेवटी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार मानले.
दादांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवणार – विजयसिंह पंडित
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, दादांनी उपेक्षीत घटकाच्या विकासासाठी, दिन दलीत आणि सामान्य माणसांठी काम केले तोच वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरभरुन आशिर्वाद दिल्यामुळे मी विधानमंडळात दहा महिन्यांत चांगले काम करु शकलो. यापुढेही अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करण्यासाठी कमी पडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.
बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले, नाना आपल्या शब्दाला किंमत आहे, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मोठी मदत केली आहे पण आपल्या प्रमुख कापुस या पिकाला बागायती चा दर्जा दिला नाही. तो मिळाला तर आल्या शेतकर्यांची दिवाळी गोड होईल.
हभप शिवाजी महाराज नारायणगडकर
यावेळी बोलताना ह.भ.प. शिवाजी महाराज महाराज म्हणाले की, शिवाजीराव दादांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले.त्यांनी भक्तीचा ध्वज उभारला.त्यांना साधुसंतांचे आशिर्वाद मिळाले, त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि शिवछत्र परिवार सुखात आहे. दादांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे ते पुढे उत्तम आणि जनकल्याणचे काम करत आहे. नगदनारायण महाराजांचा त्यांना आशिर्वाद आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.









