
नाव गुप्त ठेवले जाईल, माहिती सांगणार्यास बक्षीस
बीड, (रिपोर्टर)ः- बिंदूसरा नदीच्यापात्रामध्ये काल एका तीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा तपास सुरूच असून कोणाची मुलगी बेपत्ता असेल किंवा कोणी सदरील हा प्रकार लपवत असेल तर त्याची माहिती बीड पोलीसांना कळवा. माहिती देणार्याचे नाव गुपीत ठेवले जाणार असून माहिती देणार्यास पाच हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
काल बिंदूसरा नदीपात्रात पाण्यामध्ये तरंगत असलेल्या तीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळूनआला. सदरील या मुलीच्या अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक, जांभळ्या रंगाची टोपी होती. दोन्ही हातात काळ्या दोर्यात बांधलेल्या मनगट्या, दोन्ही पायात तांब्याच्या धातूच्या वाळ्या होत्या. सदरील या मयत मुलीबाबत कोणाला काही माहितीअसल्यास कोणाची मुलगी गायब असल्यास त्याची माहिती बीड शहर पोलिसांना देण्यात यावी माहिती देणाराचे नाव गुपती ठेवले जाणार तसेच माहिती देणार्यास पाच हजारांचे बक्षीस दिले जाईल असे आवाहन पोलीस निरिक्षक शितलकुमार बल्लाळ, उप.निरिक्षक नेवरे यांनी केले आहे.संबंधितांनी मोबाईल नं.8668895348 यावर संपर्क साधावा.








