
भिंतीला भगदाड पाडून दरोडेखोर आतमध्ये घुसले
बँकेतील नगदी 18 लाख रूपये पळविले, सीसीटिव्ही कॅमेर्याचे तोंड फिरवले, घटनास्थळी श्वानपथक, फिंगरप्रिंट पोलीस दाखल

बीड, (रिपोर्टर)ः- कॅनरा बँकेच्या भितीला पाठीमागून भगदाड पाडून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश करत गॅस कटरद्वारे तिजोरी फोडून आतील 18 लाख रूपये चोरून नेल्याची खळबळजनक घटना पाली येथे घडली आहे. या घटनेची माहिती आज सकाळी पोलिसांना झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तपासासाठी श्वानपथक, फिंगरप्रिंट पथक घटनास्थळी दाखल झाले होते. बँकेत सिसिटिव्ही कॅमेरे असल्यानेआपण त्याच कैद होवू नये म्हणुन चोरट्यांनी सिसिटिव्ही कॅमेर्याचे तोंड वळवले. दरम्यान या प्रकरणाचातपास पोलीस करत आहेत.
बीड पासून 7 किमी अंतरावर असलेल्या पाली येथे कॅनरा बँकेची राखा आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी बँकेच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत आतील तिजोरी गॅस कटरने तोडून तिजोरीमधील नगदी 18 लाख रूपये पळवून नेले. आज सकाळी हा दरोड्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिस दाखल झाले होते. चोरट्याने आतमध्ये गॅस कटर तसेच ठेवले होते. तसेच आपण सिसिटिव्ही कॅमेर्यामध्ये कैद होवू नये म्हणून कॅमेर्याचे तोंड दुसरीकडे वळवून ठेवले होते. या दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथक, फिंगरप्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.








