
जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
बीड (रिपोर्टर): यश ढाका खून प्रकरणाला दोन महिने उलटले असतानाही या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. सदरील आरोपीस अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज विविध पक्ष-संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये यश ढाका या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली तर यातील मुख्य आरोपी असलेल्या गणेश शिराळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करण्यात यावे, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात यावी, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली आहे. मोर्चा काढूनही पोलीस आरोपीला अटक करत नसतील तर मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले जाईल, असा इशारा डेमोक्रेटीक पार्टीचे अजिंक्य चांदणे यांनी दिला आहे.






