
शेख तय्यब यांच्यासोबत केली चर्चा
बीड (रिपोर्टर): बहुचर्चीत बीड नगरपालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून अनेकजण इच्छूक असून पक्षाकडूनही अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. भीमराव वाघचौरे हे गेल्या 35 वर्षांपासून नगरपालिकेमध्ये विविध पद भूषवणारे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून शहरवासियांसाठी सुपरिचीत आहेत. उद्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी मीना भीमराव वाघचौरे या इच्छूक असून त्यांनी भेटीगाठीवर त्यांनी आतापासूनच भर दिला आहे. आज त्यांनी सायं. दैनिक बीड रिपोर्टरला सदिच्छा भेट दिली. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य शेख तय्यब यांच्याशी चर्चा केली.
बीड नगरपालिकेचे अध्यक्षपद हे एस.सी.साठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे बीड नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून यावर एकीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे इच्छुकांनी पूर्ण तयारी केल्याचे दिसून येते. भीमराव वाघचौरे यांच्या पत्नी मीना भीमराव वाघचौरे या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छूक असून अजितदादांच्या गटाकडून त्या निवडणूक लढविण्याबाबत इच्छूक आहेत. त्यांनी भेटीगाठीवर भर देत सर्वांसोबत चर्चा सुरुवात केली आहे. वाघचौरे हे गेल्या 35 वर्षांपासून नगरपालिकेमध्ये नगरसेवकांपासून सभापतीपदापर्यंत काम करत आलेले आहेत. त्यांना चांगला अनुभव असून या निवडणुकीत ते आपल्या पत्नीला उमेदवार म्हणून देऊ इच्छीत आहेत. आज त्यांनी सायं. दैनिक बीड रिपोर्टरला सदिच्छा भेट देत माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळले जाणारे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य शेख तय्यब यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली.






