
गेवराई (रिपोर्टर) गेवराई शहरातील सिद्धीविनायक कॉलनी येथील सावित्री अभ्यासिका येथून रविवारी रात्रीच्या सुमारास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली असून गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरातून गाड्या चोरीचे सत्र सुरूच असून गेवराई पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
शहरातील भाऊसाहेब अलगुडे हे रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक कॉलनी येथील सावित्री अभ्यासिका येथे आपली दुचाकी क्र.एम.एच. 43 बी.एम. 2739 वरून आले होते.
दरम्यान आपली दुचाकी उभी करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आत गेले असता अज्ञात चोरट्यानी या संधीचा फायदा घेऊन त्यांची दुचाकी लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान गेवराई येथे अनेक ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत मात्र गेवराई पोलिसांचे यावर कुठलेच नियंत्रन नसल्याने या चोरीच्या घटनात वाढ होत आहे.







