
आंदोलनात महिलांचा सहभाग
बैलगाडी मोर्चास प्रशासनाने परवानगी नाकारली
बीड (रिपोर्टर): बीड ते नाळवंडी हा रस्ता अत्यंत खराब असल्याने रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी आज गावकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने कालपासून जमावबंदी आदेश लागू केल्याने त्यामुळे या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. शेतकर्यांनी नाळवंडी नाका येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. रस्त्यावरच बैलगाड्या सोडण्यात आल्या. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नाळवंडीकडे जाणार्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावरून अनेक गावांच्या नागरिकांची ये-जा असते. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे मात्र प्रशासनाकडून याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे परिसरातील गावकर्यांच्या वतीने बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते मात्र जिल्हा प्रासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने सदरील हा मोर्चा नाकारण्यात आल्याने नाळवंडी नाका येथे शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. आंदोलनकर्त्यांच्या घोषणेने नाळवंडी परिसर दणाणून गेला होता.






