• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराईत पुरवठा विभागाच्या संमतीने धान्य माफियांचा उच्छाद ; जिल्हा प्रशासनाचे मौन.?

by गणेश सावंत
January 12, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


—————–
माफियांना रान मोकळेच, गोरगरिबांचा घास माफियांच्या घशात ; कारवाई शून्य
—————-
गेवराई : (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील स्वस्त धान्य व्यवस्थेतील काळाबाजार, बोगस लाभार्थी आणि प्रशासन व धान्य माफिया संगनमताचा मुद्दा ऐरणीवर येऊनही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्राधान्य कुटुंब योजनेत 1 हजाराहून अधिक बोगस लाभार्थी योजनेत घुसवले, तसेच गेवराईतील चार शासकीय धान्य साठवणूक गोदामाला  सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने दिवसाढवळ्या होणारा धान्याचा काळाबाजार यासह अनेक संभाव्य पुरावे समोर येऊनही जिल्हा प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले असल्याचे चित्र असून, त्यामुळे जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान जिल्हा प्रशासन गेवराई पुरवठा विभागाविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याने या काळ्याबाजारात त्यांचे देखील हात काळे झालेले आहेत की काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला असून जन आक्रोश वाढताना दिसत आहे. या धान्य काळाबाजाराबाबत अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
     गेवराई, मादळमोही, उमापूर व तलवाडा येथील शासकीय धान्य गोदामांतून दर महिन्याला वितरित होणार्‍या स्वस्त धान्यापैकी जवळपास आरध्याहून अधिक प्रमाणावर धान्य काळ्या बाजारात जात असल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. गोरगरीब कुटुंबांसाठी असलेले गहू-तांदूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच धान्य माफियांच्या ताब्यात जात असून, हा प्रकार वर्षानुवर्षे बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.  चारही गोदाम सीसीटीव्हीविनाच असल्याने स्वस्त धान्याचा होणारा काळाबाजाराचा संशय अधिक गडद
होत असल्याची आणखी गंभीर बाब समोर आली होती. तालुक्यातील चारही शासकीय धान्य साठवणूक गोदामांमध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे उघड झाले. शासकीय नियमांनुसार सीसीटीव्ही बंधनकारक असतानाही, आजतागायत कॅमेरे न बसविणे ही बाब काळाबाजारासाठी मुद्दाम केलेली सोय आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. गोदामपालांनीही आपण चार्ज घेण्यापूर्वीपासूनच सीसीटीव्ही नसल्याची कबुली दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे. त्याचबरोबर स्वस्त धान्य लाभार्थी यादीतील महाघोटाळा देखील उघड झाला आहे. सुमारे एक हजारपेक्षा अधिक बोगस शिधापत्रिका तयार करून, प्रत्येकी तीन ते पाच हजार रुपयांच्या व्यवहारातून अपात्र व्यक्तींना लाभार्थी बनविल्याचा गंभीर आरोप रेशन दुकानदार संघटनांनी केला आहे. दुसरीकडे, खरे गरजू व गरीब कुटुंबे मात्र धान्यापासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी तहसीलदार संदीप खोमणे व पुरवठा निरीक्षक गजानन मोरे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले असून, जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र जिल्हा प्रशासन अद्यापही मौन धारण करुन बसल्याने जनतेमधून संताप व्यक्त होत आहे. काळाबाजार, बोगस शिधापत्रिका, धान्य माफिया आणि पुरवठा विभागाचे कथित संगनमत उघड झाले असतानाही अद्याप एकाही अधिकार्‍यावर कारवाई नाही, हेच या घोटाळ्याचे सर्वात धक्कादायक वास्तव आहे.

Previous Post

अग्रलेख- हेलिकॉप्टर पॉलिटिक्स

Next Post

गेवराईत पुरवठा विभागाच्या संमतीने धान्य माफियांचा उच्छाद ; जिल्हा प्रशासनाचे मौन.?

संबंधित बातम्या

क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
Next Post

धनंजय मुंडे लवकरच मंत्रिमंडळात दिसतील - राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे सुसंकेत!

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?