बीड (रिपोर्टर) मागासवर्गीय विद्यार्थ्यास मारहाण करणार्या मुख्याध्यापकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागासवर्गीय अन्याय अत्याचार कृषी समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
राजस्थान राज्यातील जालोर या गावातील शिक्षण घेणार्या एका मुलाने पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावल्याने त्यास मुख्याध्यापकाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोषीविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीने आंदोलन केले. यावेळी प्रशांत वासनिक ,राजु जोगदंड चंद्रप्रकाश शिंदे, बी,पी सिरसट, राजेश शिंदे, बाळासाहेब गव्हाणे, संजर होळकर, क्षीरसागर हानुमान प्रमोद शिंदे बंडू निसर्गन, नितीन सोनवणे, अॅड.प्रेरणा सूर्रवंशी, माणिक वाघमारे ,संध्रा दिलीप भोसले,वीर पुरुषोत्तम राजु महवाले,भारत कांबळे, सनी आठवले,धामानंद,वाघमारे,सोईनाथ जाधव, बाबासाहेब काकडे ,प्रेमधर्मेंद्र, कांबळे, चंद्रतकाने शामराव साबळे, गणेश माने, सचिन, सोनवणे., अविनाश,जोगदंड, पठाण नासरखान, रवि वाघमारे संतोष जोगदंड,रांच्रासह आदिंची उपस्थिती होती.










