बीड (रिपोर्टर) पत्रकार रईस पठाण यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले. पठाण हे इंदिरा गांधी उर्दू स्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. रईस पठाण हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून सर्वत्र परिचीत होते. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.