• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
March 24, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

; रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बारामतीजवळ घडलेल्या लियरजेट-४५ विमान दुर्घटना प्रकरणी अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात ‘झिरो FIR’ स्वरूपात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असण्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. किरकोळ चोरीच्या घटनांमध्येही गुन्हे दाखल होतात, मात्र इतक्या मोठ्या दुर्घटनेत गुन्हा नोंदवला गेला नाही, अशी टीका त्यांनी केली होती.


28 जानेवारीची भीषण दुर्घटना
मुंबईहून बारामतीकडे येणारे VT-SSK नोंदणीचे बॉम्बार्डियर लियरजेट-45 विमान 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8.43 ते 8.45 वाजण्याच्या दरम्यान बारामती विमानतळाजवळ कोसळले होते. VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत चालवले जाणाऱ्या या विमान दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होता.
या प्रकरणी रोहित पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173(1) अंतर्गत तक्रार दाखल केली. यापूर्वी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसेच 26 फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता; मात्र त्यावेळी FIR नोंदवण्यात आला नव्हता. पुणे सीआयडीकडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.


गुन्हेगारी कटाचा संशय
रोहित पवार यांच्या तक्रारीनुसार ही घटना केवळ अपघात नसून नियोजित गुन्हेगारी कटाचा भाग असू शकते. विमान सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन, बनावट नोंदी तयार करणे, देखभाल प्रक्रियेत निष्काळजीपणा आणि ऑपरेशनमधील गंभीर त्रुटी यांचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
24 फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सादर केलेल्या सुरक्षा लेखापरीक्षण अहवालात VSR कंपनीची काही विमाने उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले होते. संबंधित VT-SSK विमानाने सुमारे 4,915 उड्डाण तास पूर्ण केले होते, जे 5,000 तासांच्या अनिवार्य इंजिन ‘टाइम बिफोर ओव्हरहॉल’ (TBO) मर्यादेच्या अत्यंत जवळ होते. तरीही विमान व्यावसायिक वापरात ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


उड्डाण तासांबाबत गंभीर प्रश्न
तपासादरम्यान विमानाचे प्रत्यक्ष उड्डाण तास अधिक असून अधिकृत नोंदींमध्ये कमी दाखवण्यात आल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. काही माहितीनुसार विमानाने 8,000 तासांपेक्षा अधिक उड्डाण केले असण्याचा संशय असून, हे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून तांत्रिक चौकशी सुरू असताना स्वतंत्र गुन्हेगारी तपासही करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

कटाक्ष/बेबंदशाहीचे तुषार…दोषी कोण?

Next Post

कटाक्ष -संस्कार हरवले, स्क्रीन जिंकली

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

कटाक्ष -संस्कार हरवले, स्क्रीन जिंकली

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?