बीड (प्रतिनिधी) – सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या आदेशानुसार सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांना जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी एकूण सात रिमांड वॉरंट जारी करण्यात आले. पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे कलम 141 बी.एन.एस.एस. अन्वये प्राप्त अहवालाच्या आधारे संबंधित आरोपींनी यापूर्वी कलम 126 बी.एन.एस.एस. अंतर्गत सार्वजनिक शांतता राखण्यासाठी दिलेल्या अंतिम बंधपत्राचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध कलम 141 (1)(ब) बी.एन.एस.एस. प्रमाणे कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – अंगद कोंडीराम निकम (वय 44), बाळू मदन करपे (वय 38), सुरेश बाबुराव उगले (वय 51), अभिषेक हनुमान करपे (वय 24), मनोज राजेंद्र करपे (वय 28), रविंद्र रामप्रसाद करपे (वय 29) व प्रदीप मुरलीधर करपे (वय 28), सर्व रा. कुमशी, ता. जि. बीड.
सदर आरोपींना उर्वरित कालावधीसाठी जिल्हा कारागृह, बीड येथे रवानगी करण्यात आली असून त्यांना दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या समक्ष हजर करण्यात येणार आहे.
सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीड पोलीस दल कटिबद्ध असून बंधपत्राचा भंग करणार्यांविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








