Friday, May 20, 2022
No menu items!
Homeराजकारणग्रामीण भागातल्या मतदारांचे नावे न.प.मतदार यादीत

ग्रामीण भागातल्या मतदारांचे नावे न.प.मतदार यादीत


१५ जानेवारीला मतदान होणार्‍या जिरेवाडी,रामनगर
येथील मतदारांचेही बीड न.प.च्या मतदार यादीत नावे
बीड (रिपोर्टर):-राज्यामध्ये अनेक मतदारांची नावे दुबार असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला प्राप्त होत असतात. निवडणूक आयोगही प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीमध्ये दुबार मतदारांनी आपले नाव एका मतदार यादीतून कमी करावेत असे आवाहन करते मात्र हे मतदार त्याकडे साफ दुर्लक्ष करतात आणि त्याचा फायदा सत्ताधारी किंवा मोठे राजकीय प्रस्त असलेले लोक मोठ्या हितमतीने उचलतात आणि आपण निवडूण यावे यासाठी अनेक ग्रामीण भागातील मतदारांची नावे ही न.प.आणि मनपाच्या यादीत लावून घेतात. बीड नगर पालिकेच्या मतदार यादीतही अनेक ग्रामीण भागातील लोकांची नावे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. इतकेच काय, ग्रामीण भागातील कर्मचार्‍यांची नावेही बीड नगर पालिकेच्या
यादीत असल्याचे सिद्ध ही झाले हेाते. आता १५ जानेवारी रोजी मतदान होणार्‍या ग्रुप ग्रामपंचायत जिरेवाडी, रामनगर येथील मतदारांची नावेही न.प.च्या मतदार यादीत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आले आहे.
नगर पालिकेच्या शेजारी असलेल्या ग्रामीण भागातील मतदारांची नावे नेहमीच न.प.च्या मतदार यादीत येतात. १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत १५ जानेवारी रोजी मतदान होणार्‍या जिरेवाडी, रामनगर येथील मतदारांची नावे बीड नगर पालिकेच्या यादीत आहेत. त्यासोबतच आम्ला, वाहेगाव, ग्रामपंचायत कोळवाडी, वडगाव आहेर आणि शिराळा ता.गेवराई येथील मतदारांची नावेही नगर पालिकेच्या यादीत आहेत. त्यासोबतच परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ग्रामपंचायत मतदारांची नावेही परळी न.प.च्या यादीत आहेत. त्यामुळे अशा दुबार असलेल्या मतदारांनी आपले नावे कमी न केल्यामुळे उद्या १५ जोनवारी रोजी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांचे आधार सत्यता पडताळण्यासाठी आधार पंजीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी बीड जिल्हा निवडणूक विभागाकडे संजय शहागीर मोहिते यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. त्यासोबत दुबार ठिकाणी मतदान यादीत नाव असलेल्या मतदारांची यादीही पत्रकासोबत जोडली आहे.

Most Popular

error: Content is protected !!