• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गुरुजींचा दिल्ली डंका; दोघांना राष्ट्रपती पुरस्कार; आष्टी, गेवराई तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश, ५ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार सन्मान

by Beed Reporter
August 25, 2022
0
गुरुजींचा दिल्ली डंका; दोघांना राष्ट्रपती पुरस्कार; आष्टी, गेवराई तालुक्यातील दोन शिक्षकांचा समावेश, ५ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार सन्मान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर)

टीईटी प्रकरणामध्ये बीडच्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुखद धक्का पहावयास मिळाला. आष्टी आणि गेवराई येथील शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिक्षकांना पुरस्कार जाहीर केला जातो. बीडला पाच वर्षानंतर दोन शिक्षकांना पुरस्कार घोषीत झाल्याने जिल्हाभरातील शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. ५ सप्टेंबर रोजी दोन्ही शिक्षकांना दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. बीड (रिपोर्टर) टीईटी घोटाळा प्रकरणाने काळवंडलेला बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आजचा सूर्य आशेचा किरण घेऊन उगवल्याने जिल्ह्यात समाधान व्यक्त होत आहे. आष्टी आणि गेवराई तालुक्यात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणार्‍या दोन शिक्षकांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिल्यानंतर टीईटी घोटाळ्यात काजळलेला जिल्हा पुन्हा एकदा या बातमीने उजळून निघाला.

गेवराईचे शशीकांत संभाजीराव कुल्थे आणि आष्टीचे सोमनाथ वाळके या दोन शिक्षकांना सदरचा पुरस्कार जाहीर झाला असून ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते या पुरस्काराने दोन्ही शिक्षकांना सन्मानीत करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील टीईटी घोटाळा प्रचंड प्रमाणात गाजत आहे. ज्ञानदान करणारे शिक्षक भ्रष्टाचारी असल्याचे या घोटाळ्याने पदोपदी दिसून येत असतानाच ज्ञानदानात सर्वोत्कृष्ट कार्य बीड जिल्ह्यातच होते हे पुन्हा एकदा या पुरस्काराच्या घटनेने दिसून आले आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने देशभरातील शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणार्‍या शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो. यावर्षी बीड जिल्ह्यातील दोन गुरुजी या पुरस्कारास प्राप्त झाले आहेत. यामध्ये आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे सोमनाथ वाळके यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात मुलांना काय हवं, त्यांचा ज्ञानार्जन कसं असावं, याचा शोध अन् बोधयुक्त कर्म वाळकेंनी वेळोवेळी केला. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक आशयाचे ज्ञान वाळके यांनी शिक्षण पद्धतीमध्ये अवलंब करत मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी संगणक, प्रोजेक्टर, व्हिडिओ रेकॉर्डींग आदी साहित्याचा वापर करून लोकसहभागाला चालना दिली. लोकसहभागातून १५ लाख रुपयांची आर्थिक मदत उभारत डिजिटल शाळा उभा करून त्या शाळेत चित्राच्या स्वरुपात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची भूक भागवताना चित्ररुपी ज्ञानाचे पोषक खाद्य वाळकेंनी दिले तर दुसरे गेवराई तालुक्यातील शशीकांत कुल्थे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दामूनाईक तांडा येथे कार्यरत असताना तांड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून आजच्या युगाबरोबर नेताना समाज सहभागातून ई लर्निंग शाळा उभारत डिजिटल साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. मराठी विश्‍वकोष, संगीतकला विहार, एआय नेट, लेखण सहभाग, तथा साठहून अधिक आकाशवाणी कार्यक्रम घेत येथील विद्यार्थ्यांबरोबर अन्य विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसोबत उर्दू पदविका आणि गोरमाटी भाषेचा अभ्यास असलेले हे शिक्षक शशीकांत कुल्थे यांना आतापर्यंत चार राष्ट्रीय, राज्य पातळीवरील ११, विभागस्तरावर २, जिल्हास्तरावर २१, तालुकास्तरावर १, केंद्रस्तरावर १, गावस्तरावर २ असे एकूण ४२ पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषीत झाल्याने त्यांच्या कामाची ही सर्वोत्कृष्ट पावती मानली जातेय. या दोघांनाही राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

Previous Post

सोसायटीत सरपंचाचे पॅनल पडल्याने शहाजनपूर चकलाचा पाणीपुरवठा बंद, महिला आक्रमक, महामार्ग अडवला

Next Post

बांधकाम मजुरांना अटल योजनेतून घरकुल मिळणार, घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये, मजुरांची नोंदणी असणे आवश्यक

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
ग्रामसेवकाच्या मदतीने पैशावाल्या बेघरांचा डबल गेम, एकाच पीटीआरवर दोन-दोन तीन-तीन घरकुल

बांधकाम मजुरांना अटल योजनेतून घरकुल मिळणार, घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रुपये, मजुरांची नोंदणी असणे आवश्यक

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?