Home राजकारण काकु-नाना आघाडीला झटका चार नगरसेवक शिवसेनेत

काकु-नाना आघाडीला झटका चार नगरसेवक शिवसेनेत


बीड (रिपोर्टर)- आ. संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या चार नगरसेवकांनी आज थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने काकु-नाना आघाडी पुन्हा एकदा संकटात आल्याचे चित्र दिसून येत असून या चारही नगरसेवकांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्‍चय केला आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांसह नगराध्यक्ष भारतूभषण क्षीरसागर यांना शह देण्यासाठी आ. संदीप क्षीरसागरांनी काकु-नाना विकास आघाडी स्थापन करून गत पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आणले होते मात्र गेल्या काही दिवसांच्या कालखंडात एक-एक नगरसेवक काकु-नाना विकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. आज पुन्हा चार नगरसेवकांनी काकु-नाना विकास आघाडीला रामराम ठोकला आहे. नगरसेवक गणेश तांदळे, रणजीत बनसोडे, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे या चार नगरसेवकांनी आज नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आगामी काळात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version