Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपावरलिफ्टींग स्पर्धेमध्ये सागर नागापुरे यास गोल्ड मेडल

पावरलिफ्टींग स्पर्धेमध्ये सागर नागापुरे यास गोल्ड मेडल

माजलगाव (रिपोर्टर):- औरंगाबाद जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशन व साई जिम यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात माजलगाव येथील सागर सुहास नागापुरे याने गोल्ड मेडल पटकावले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.


औरंगाबाद जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या वतीने ३१ जानेवारी रोजी छावणी मधील साई जीम येथे जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये विविध वजनी गटात स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ७४ किलो वजनी गटात दहा स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये सागर नागापुरे याने डेड लिफ्ट -१२०.५ किलो,बेंच प्रेस-६० किलो,स्कॅट-९० किलो वजन सहज पेलवले व स्पर्धेतील गोल्ड मेडल पटकावले.या यशामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सागर यास स्पर्धेचे संयोजक ऍड. सुरेश वर्मा, पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी महापौर त्र्यंबक तुपे,राज्य जनरल सेक्रेटरी संजय सरदेसाई,अकबर सर यांच्या उपस्थितीत गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले

सागर याच्या यशाबद्दल त्याचे वेदांत देशमुख, केदार खामगावकर,संकेत अरसुळ, संकेत अरणकल्ले,सिध्दांत देशमुख, कपिल फफाळ,रोहित मुळक,अभिजित भेम्बरे यांनी अभिनंदन केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!