Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी तालुक्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे सत्र सुरुच पाटण सांगवी येथील पुन्हा १५ कोंबड्याचा...

आष्टी तालुक्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे सत्र सुरुच पाटण सांगवी येथील पुन्हा १५ कोंबड्याचा मृत्यू

आष्टी ( रिपोर्टर ) :- कुक्कुटपालन शेडमधील १५ कोंबड्यां अज्ञात रोगाने दगावल्या असल्याची घटना सोमवारी रात्री आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे उघडकीस आली आहे. आष्टी तालुक्यातील कोंबड्या मरण्याचे मृत्यू सत्र सुरूच असून याचे निदान होत नसल्याने शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायिकांत धास्ती वाढत चालली आहे.
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीज हजार कोंबड्याचे शेड आहे. यातील १५ कोंबड्या सोमवारी रात्री अचानक अज्ञात रोगाने दगावल्याची घटना घडली आहे. आजपर्यंत तालुक्यात शिरापुर,पिंपरखेड, धानोरा, केरूळ, सराटेवडगांव, खिळद, येथे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्ल्‌यूची धास्ती असली तरी आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मग अचानक मेलेल्या कोंबड्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यानंतर समजेल. मंगळवारी सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अरूण तुराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृत कोंबड्याची विल्हेवाट लावली.
कोंबड्याच्या मृत्यूचे कारण अहवाल
आल्यानंतर कळेल -डॉ. मंगेश ढेरे

कोंबड्या व पक्षांच्या मृत्यूबाबत, आजवर मरण पावलेले पक्षी किंवा कोंबड्या या बर्ड फ्ल्‌यूने मेल्या नाहीत. पाटण येथील प्रकरणात अहवाल आल्यानंतर कळेल, असे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!