बीड (रिपोर्टर) शहरातील बसस्टँडच्या पाठिमागील नालीमध्ये पडून एका 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली आहे.
सुधीर आनंतराव इंगळे (रा. पंचशील नगर, बीड, वय 50 वर्षे) हे बसस्टँडच्या पाठिमागे असलेल्या नालीमध्ये रात्री पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला होता.