शहरातून भव्य शोभायात्रा, यात्रेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
परळी (रिपोर्टर) परळी येथे नाथ प्रतिष्ठाण व राधामोहन साथी प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून आज सकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी झाली. या यात्रेचा शुभारंभ बियाणी परिवार यांच्या नाथ टॉकीज परिसरातील निवासस्थानावरून झाला. याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे, राजश्रीताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.
शहरातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. या वेळी राजश्रीताई मुंडे, वाल्मिक कराड, चंदुलाल बियाणी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सदरील देखावा परळी येथील राकेश चांडक यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. दुर्गादेवीची नऊ रुपये नऊ ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. वैष्णोदेवी येथून आणलेली अखंड दिव्यज्योत या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. पंजाब येथील प्रसिद्ध बँड, तसेच पोलीस बँड पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. लेझीम पथक, मोर पथक, संभळ, आराधी, गोंधळी यामध्ये सहभागी झाले होते. शोभायात्रेमध्ये बीड शहरातील शेकडो नागरिकांचा सहभाग होता.









