परळी (रिपोर्टर) पुणे येथील गोरजाई नगर चाकण या परिसरातील एका 30 वर्षीय महिलेचा नवर्याने एक लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या घटनेचे कनेक्शन परळी तालुक्यातील कन्हेरवाडी या गावापर्यंत पोहोचले आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, अशा गोरख देशमुख वय 30 वर्ष रा. गोरजाई नगर,चाकण पुणे यांचा खून करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी सचिन मुंडे, देवा मानवर व रॉकी नावाच्या इसमास गोरख देशमुख यांनी दिली. याप्रकरणी सदरील महिलेच्या नवर्याने 5 सप्टेंबर रोजी चाकण पोलीस स्टेशनला मिसिंगसी तक्रार दाखल केली होती.
दरम्यान या प्रकरणातील तीन आरोपींनी सदरील महिलेस मारून चाकण येथील जंगलात खड्डा करून प्रेत पुरुन टाकले. नंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून परत ते प्रेत उकरून डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पावसामुळे प्रेत अर्धवट जळाले होते ते पाहण्यासाठी सदरील आरोपी दोन दिवसांनी गेले असता ते प्रेत अर्धवट जळालेले दिसले म्हणून परत त्यांनी त्या प्रेतास दगड बांधून तलावात फेकून दिले होते.
पोलिसाकडे कुठलाही ठोस पुरावा नसताना केवळ आरोपीचे आडनाव माहित होते. संबंधित आडनावाच्या अनुषंगाने चाकण पोलीस ठाण्याचे पोलीसांनी परळी शहर पोलीस ठाण्याचे डिबी पथक प्रमुख भास्कर केंद्रे यांना संपर्क केला. नियोजनबद्ध सापळा रचुन गोपनीय माहिती काढून सुपारी किलर सचिन मुंडे याचा भास्कर केंद्रे व गोविंद भताने यांनी मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे आरोपी मोबाईल वापरत नसल्यामुळे तसेच पूर्ण नाव,पत्ता माहित नसूनही अत्यंत कसोशीने प्रयत्न करून मोठ्या सिताफिने आरोपीस पकडून पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यास परळी डीपी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे व गोविंद बताने यांना यश आले आहे.डीपी पथकाने केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.