Monday, April 19, 2021
No menu items!
Home क्राईम 37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

37 लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड रिपोर्टर

24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बीड तालुक्यातील कुमशी शिवार येथून एक संशयित कंटेनर उभा असल्याचे आढळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्यात गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणा-या विदेशी मद्याच्या 550 पेट्यांचा साठा आढळून आला. ज्यात रियल सेव्हन व्हिस्की ब्रॅंडच्या 750 मिली क्षमतेचे 150 बॉक्स, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेचे 60 बॉक्स , रॉयल स्टॅग व्हिस्की ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेचे 20 बॉक्स, मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेचे 320 बॉक्स अशा विदेशी दारुचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 36 लाख 72 हजार 600 इतकी आहे. तसेच जप्त कंटेनरची किंमत अंदाजे 12 लाख इतकी आहे. कंटेनरच्या चालक विष्णू भागवत कांबिलकर , वय 32 वर्ष, रा. मनकुरवाडी, ता. जि. बीड असे असून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री कांतीलाल उमाप व औरंगाबाद विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड नितिन धार्मिक यांचे नेतृत्वाखाली निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड श्री डि.एल.दिंडकर, दुय्यम निरिक्षक श्री एस.बी.शेळके, श्री ए.जे. राठोड, श्री ए.आर.गायकवाड, श्री ए.एस. नैबळ, जवान सचिन सांगुळे, अमीन सय्यद, नितिन मोरे, प्रशांत मस्के, आर.एम.गोणारे, वाहनचालक शेळके यांनी सदर कारवाई केली. आवाहन नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी केले आहे.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...