बीड (रिपोर्टर) जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज सकाळी जिल्हा रूग्णालयामध्ये भेट देवून तेथील विविध वार्डाची पाहणी केली. आयसीयु विभाग अत्यंत सुसज्जपणे उभारण्यात आला असून त्याठिकाणची स्वच्छता पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्र्यासमवेत जिल्हाधिकारी शर्मा, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांची उपस्थिती होती.
राज्याचे सहकारमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले आहेत. आज सकाळी त्यांनी जिल्हा रूग्णालयामध्ये जावून तेथील विविध वार्डची पाहणी करून काही रूग्णांशी चर्चा केली. गेल्या काही दिवसापूर्वी आयसीयु वार्ड उभारण्यात आला आहे. या वार्डाची स्वच्छता आणि तेथील नियेाजन पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शर्मा, जि.प.चे सीईओ अजित पवार, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे सह आदिंची उपस्थिती होती.