सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने क्रिडा विभागाच्यावतीने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ आज सकाळी पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी शर्मा, सीईओ अजित पवार, जिल्हा पोलिस अधिक्षक ठाकूर, खेळाडू अविनाश साबळे सह आदिंची उपस्थिती होती. ही दौड छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान आयोजीत करण्यात आली होती. यामध्ये शासकीय कर्मचार्यांसह आदिंचा सहभाग होता.