बीड (रिपोर्टर) बीड शहरातील सोमेश्वर वॉशिंग सेंटरवर गाड्या धुण्याच्या कारणावरून एका कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सागर संजय थोरात (वय 22 वर्षे, रा. बीड) हे बीड शहरातील बार्शी रोड येथील सोमेश्वर वॉशिंग सेंटरवर कामाला आहे. काल रात्री त्याठिकाणी गांधीनगर येथील काही तरुण त्यांची चारचाकी गाडी धुण्यासाठी आले होते. माझ्या गाडीची व्यवस्थीत वॉशिंग कर, असे म्हणत कामगार सागर थोरात याला आठ ते दहा जणांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी रात्री बीड शहर पोलिसात मोठा जमा जमला होता. जखमी सागर थोरात याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून शहर पोलिसात आरोपीं-विरोधात तक्रार दिल्याचे समजते. मात्र दुपारी उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे बीड शहर पोलिसांनी सांगितले.