बीड (रिपोर्टर) कर्नाटकात ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुराला सर्पदंश झाला होता. त्याला उपचारासाठी काल बीडमध्ये आणले असता त्याचा मूत्यू झाला.
सिकंदर अप्सर शेख (रा. कुर्ला) हे आपल्या कुटुंबासह कर्नाटकला ऊसतोडणीसाठी गेले होते. 5 नोव्हेंबर रोजी त्यांना ऊस तोडत असताना साप चावला. कर्नाटक येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने काल त्यांना बीडला उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सिकंदर शेख यांचा मृत्यू झाला.