Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाने फास आवळला तीन दिवसात सोळा जणांचा मृत्यू;१ हजार १०३ नवे रूग्ण

कोरोनाने फास आवळला तीन दिवसात सोळा जणांचा मृत्यू;१ हजार १०३ नवे रूग्ण


बीड (रिपोर्टर):- गेल्या एक वर्षापासून जनता कोरोनाने त्रस्त आहे. मध्यंतरी काही प्रमाणात रूग्णसंख्या घटल्याने नागरिकांनी सुटकेचा श्‍वास टाकला होता. मात्र पुन्हा एकदा बीड जिल्ह्यासह शहरात कोरोना फास आवळला असून रोज रूग्णांच्या संख्यात झपाट्याने वाढ होत असतांना मृत्यूची संख्या ही वाढत आहे. गेल्या तीन दिवसाता जिल्ह्यात १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर १ हजार १०३ नव्या रूग्णांची भर पडली आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


जिल्ह्यातील संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य प्रशासन मोठे प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने त्यांच्या प्रयत्नाला हवे तसे यश मिळत नाही. काल आरोग्य विभागाने जिल्हाभरातू २ हजार ६७९ संशयितांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये नव्या ३८५ रूग्णांची भर पडली. आजही पॉझिटिव्ह रूग्णामध्ये सर्वाधिक आकडा बीड तालुक्याचा असून सर्वाधिक आकडा बीड तालुक्याचा असून तो १११ आहे. त्या पाठोपाठ अंबाजोगाई ८५, आष्टी ३९, केज ४१, पाटोद २९, गेवराई १२, माजलगाव २०, धारूर १३, शिरूर १०, वडवणी ९ आणि परळी तालुक्यात १८ रूग्ण आढळून आले आहेत. परवा दिवशी नऊ
बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर काल दिवसभरात ६ तर आज दुपारपर्यंत एका पॉझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने तीन दिवसात १६ जण कोरोनाचे शिकार झाले आहेत. आता पर्यंत जिल्ह्यात एकूण २५ हजार ८९७ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यापैकी २३ हजार ५०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात ६४२ जणांचा मृत्यू आत्तापर्यंत झाला असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!