बीड (रिपोर्टर) गावात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. रोहयोवर काम करण्यासाठी मजुरांना जॉबकार्डची गरज असते. काही महिन्यापूर्वी गावागावात मजुरांचे जॉबकार्ड काढण्यात आले. या जॉबकार्डच्या माध्यमातून विविध कामावर सध्या मजूर कार्यरत आहेत. जॉबकार्डमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जॉबकार्डचे आधारशी लिंक करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जॉबकार्ड आधारशी लिंक केले जात आहेत. बीड तालुक्यात 26 हजार जॉबकार्ड असून आतापर्यंत दहा हजार जॉबकार्ड आधारशी लिंक झाले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी रोजगार हमी योजनेची कामे सुरू असतात. या कामावर मजुराची हजेरी असते. रोहयोच्या कामावर जाण्यासाठी मजुरांना जॉबकार्ड असणे गरजेचे असते. काही महिन्यापूर्वी मजुरांचे जॉबकार्ड काढण्यात आले होते. गरजेनुसार मजुरांचे कार्ड कधीही काढता येतात. जॉबकार्ड बाबत काही तक्रारी आल्यानंतर जॉबकार्ड आधारशी लिंक करण्याचे आदेश शासनाच्यावतीने प्रशासकीय अधिकार्यांना देण्यात आले. बीड तालुक्यात 26 हजार जॉबकार्ड आहेत. आतापर्यंत दहा हजार जॉबकार्डचे आधारशी लिंक करण्यात आले आहेत. उर्वरित राहिलेले जॉबकार्ड लिंक करण्याचे काम सुरू आहे.