नागपूर (रिपोर्टर) सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य प्रबंधक आशिष आसाटी यांची आ. लक्ष्मण पवार यांनी भेट घेऊन त्यांच्याशी रस्त्या संदर्भात चर्चा केली आहे.
नागपूर येथे राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य प्रबंधक आशिष आसाटी यांची आ. लक्ष्मण पवार यांनी भेट घेऊन गेवराई शहरातून जाणार्या दोन बायपासच्या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामागार्च अर्धवट अवस्थेत बंद पडलेले काम लवकरात लवकर बॅचमिक्स पद्धतीने सुरू करावे, अशी मागणी पवार यांनी केली. महाप्रबंधकांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला आ. पवार यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.