बीड (रिपोर्टर) एसकेपी ग्रुप व शुजा क्रीडा मंडळातर्फे आयोजीत रिपोर्टर चषक बीएएफएल सिजन 2 फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजकांसह खेळाडू, क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसकेपी ग्रुप शुजा क्रीडा मंडळातर्फे दरवर्षी रिपोर्टर चषक बीएफएल फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी सिजन टू मध्ये 9 संघात सामने होणार आहेत. काल छत्रपती संभाजीराजे क्रीडा मंडळावर सदरच्या स्पर्धेचे उद्घाटन सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, शेख निजाम, शामराव पडुळे, शेख राजू यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार शुजा क्लबचे इम्रान सर व त्यांच्या टीमने केले. काल दिवसभरात छत्रपती संभाजीराजे क्रीडा मंडळाच्या मैदानावर पाच सामने झाले. या वेळी संपादक शेख तय्यब, अनिल जगताप यांनी उपस्थित खेळाडुंसह क्रीडा प्रेमींना मार्गदर्शन केले.