बीड (रिपोर्टर): हॉटेल मध्ये काम करणार्या एका 40 वर्षींय मजुराची दगडाने ठेचुन हत्या करण्यात आल्याचा खळबळ-जनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. हा खुन कोणी आणि कशासाठी केला हे मात्र समजु शकले नाही. घटनास्थळी शिवाजी नगर पोलिस दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दत्तात्रय राधाकिसन इंगळे वय 40 वर्षे, रा.हिवससिंगा हा पालवन चौकातील एका हॉटेलमध्ये नोकर म्हणुन काम करत होता. त्याचा मृतदेह आज सकाळी पालवन चौकातील एका झाडाच्या खाली ठेचलेल्या अवस्थेत दिसुन आला. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. एलसीबी आई फिंगर पथकही दाखल झाले होते. मजुराचा कोणी आणि कशामुळे केला असावा याचा तपास पोलिस करत आहेत.