Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनातरुणांनो लसीकरणासाठी गर्दी करू नका,ऑनलाईन नोंदणी करा वयोवृद्धांना ऑनलाईन नोंदणीची गरज नाही

तरुणांनो लसीकरणासाठी गर्दी करू नका,ऑनलाईन नोंदणी करा वयोवृद्धांना ऑनलाईन नोंदणीची गरज नाही


बीड (रिपोर्टर):- दुसर्‍या लाटेनंतर जिल्ह्यात लस घेण्यासाठी एकच झुंबड उडू लागली आहे. आरोग्य विभागाने लसीकरणाचे नियम घालून दिले आहेत. मात्र शहाणेसुरते लोकच गोंधळ करत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. १८ ते ४५ वयोगटासाठी ग्रामीण भागात लसीकरण होत नसून केवळ तालुक्याच्या ठिकाणी त्यांना लस दिली जात आहे. त्यासाठीही त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून अपॉईंटमेंट घेणे गरजेचे आहे. तर ४५ वयोगटा पुढील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी टोकन घेऊन दिलेल्या वेळेत लसीकरण करून घ्यावे जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सचा फज्जा उडणार नाही याची काळजी स्वत: लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.
सध्या जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटासह ४५ च्या पुढच्या लोकांना लस दिली जाते. मात्र ही लस देताना आरोग्य विभागाने नियमाली घालून दिलेली आहे मात्र नागरिक त्याचे पालन करत नसल्यानेच लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला याचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून अपॉईंटमेंट घेणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी केवळ बीड शरातील चंपावती विद्यालय, अंबाजोगाई, गेवराई, परळी, केज आणि आष्टी या ठिकाणीच लस मिळणार आहे तर ४५ वयोगटाच्या वरील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी लसीकरण केंद्रावर जावून टोकन घेऊन दिलेल्या वेळेत लस घ्यावी. ४५ वयाच्या आतील नागरिकांनी कोणत्याही लसीकरण केंद्रावर जावून गर्दी न करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!