ड (रिपोर्टर)):- बीड मतदार संघातील खालापुरी ता. शिरूर का. येथे प्रथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्ण होत असून तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य आयुक्त,मुंबई यांच्याकडे केलेले पाठपुराव्यास यश आले असून खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 दि.24.11.2021 मधुन तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जि.प.बीड मधील आरोग्य समिती ठराव क्र.169 दि.26 नोव्हेंबर 2021 व जि.प.बीड सर्वसाधारण सभा दि.24.12.2020 मधील ठराव क्र.468 व दि.21 जुन 2021 मधील ठराव क्र.569 नुसार मंजुर करण्यात आलेला आहे. याबाबतीच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून लवकरच निविदा प्रक्रियास्तरावर असून ते पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शिरूर का. तालुक्यातील खालापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी ग्रामस्थ गेले अनेक वर्षापासून मागणी करत होते. कारण आरोग्य विषयक सेवेसाठी येथील ग्रामस्थांना शिरूर किंवा बीडकडे जावे (पान 7 वर)
लागायचे. या संदर्भात तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आरोग्य आयुक्त,मुंबई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले असून तीन कोटी रुपयांचा निधी आरोग्य केंद्रास मंजूर झाला आहे. याबाबतीत सर्व तांत्रिक अडचणी दूर झाले असून लवकरच या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची सुरुवात होणार आहे. यामुळे खालापुरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असून, आरोग्य विषयी आता ग्रामस्थांना भटकंती करण्याची गरज नाही असे आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.