Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना बाधीत रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या, बीड शहरातील दिप हॉस्पिटलमधील घटना

कोरोना बाधीत रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या, बीड शहरातील दिप हॉस्पिटलमधील घटना

पीएम करण्याची नातेवाईकांची मागणी

बीड (रिपोर्टर):- कोरोना बाधीत रुग्णाने गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे बीड शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवी सानप यांच्यासह पोलीसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली असून दुपारी एक वाजेपर्यंत पीएम झालेले नव्हते.
शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये रामलिंग महादेव सानप (वय ३५ वर्षे, रा. तांदळ्याची वाडी) हे कोरोनावर उपचार घेत होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी हॉस्पिटलमधील तिसर्‍या मजल्यावर स्वत:जवळील रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या पोलीसांना होताच घटनास्थळी पीआय रवि सानप, एपीआय अंतरप, एएसआय बब्रुवान गांधले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. नातेवाईकांनी शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयातील पीएम रुममध्ये दुपारी एक वाजेपर्यंत होता. पीएम झाले नसल्याने नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पीएम करण्याची मागणी केली. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पीआय रवि सानप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सुसाईडची केस असल्याने पीएम करणे गरजेचे आहे. आम्ही स्वत: ते करून गेणार आहोत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!