Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड जिल्ह्यात ५ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू शहरात १८४ सडकफिर्‍यांमध्ये आढळले...

बीड जिल्ह्यात ५ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू शहरात १८४ सडकफिर्‍यांमध्ये आढळले ३ पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेला कोरोनाचा कहर आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. सध्या बीड जिल्ह्यात ५ हजार ३८७ कोरोना रुग्णांवर उपचार सुर आहेत. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत १८४ सडकफिरे तपासण्यात आले. त्यामध्ये तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सडकफिर्‍यांचा हा आकडा दिवसेंदिवस कमी येत असल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी येऊ लागली आहे. ही आनंदाची बाब आहे. आजही पाच हजाराच्या पुढे रुग्णांची तपासणी केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५ लाख १५ हजार ३८४ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४ लाख ३१ हजार ११४ जण निगेटिव्ह आढळून आले आहे तर ८४ हजार २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी ७६ हजार ९०० जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या बीड जिल्ह्यात फक्त ५ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील रोज सातशे ते आठशे जण कोरोनावर मात करून घरी जात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!