Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमसामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांच्यावर प्राणघातक हल्ला

सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांच्यावर प्राणघातक हल्ला


आठ महिन्यापासून शिवीगाळ होत असल्याने जाब विचारल्याने कुर्‍हाडीने वार
शिरूर कासार (रिपोर्टर):- आमच्या वाद्याला सहकार्य केल्याच्या संशयातून गेल्या आठ महिन्यापासून रोज शिवीगाळीला सामोरे जाणार्‍या व आज शिवीगाळ का करता म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करून अजिनाथ गवळी सह त्यांच्या वडिलांवर कुर्‍हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तालुक्यातील गोमळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी हे व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धीला मदत करत असल्याचा संशय व राग मनात धरून बर्‍याच दिवसापासून शिवीगाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र त्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केले मात्र आज सकाळी ते गावातील कोरोना संक्रमित व्यक्तीला बीड येथे पाठवण्यासाठी गोमळवाडा गावाकडे जात असताना रस्त्यावर आदिनाथ गवळी व त्यांचे वडील मारुती गवळी यांच्यावर गावातीलच सचिन कातखडे व इतरांनी कुर्‍हाडी, लोखंडी टांभीने, दगडांनी हल्ला करून गंभीर जख्मी केले. जखमींना ज्ञानसुधा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!