Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeदेश विदेशइंधन दरवाढीच्या निषेधार्थ बीडमध्ये कॉंग्रेसची निदर्शने

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बीडमध्ये कॉंग्रेसची निदर्शने


बीड (रिपोर्टर):- केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसची मोठया प्रमाणात दरवाढ केली. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवाढीच्या निषेधार्थ आज कॉंग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने दरवाढीमुळे सर्वसामान्यात संताप व्यक्त केला जात आहे. दरवाढीच्या निषेधार्थ आज कॉंग्रेसने निदर्शने केली. या वेळी तालुकाध्यक्ष महादेव धांडे, ऍड. कृष्णाराव पंडित, ऍड. राहूल साळवे, योगेश शिंदे, इद्रिस हाशमी, वचिष्ठ बडे, गोविंद साठे, अरुण कांबळे, परवेज कुरेशी, अविनाश डरपे, संतोष निकाळजे, जयप्रकाश आघाव, ऍड. गणेश करांडे, नितीन वडमारे, सिराजभाई, जाकेर पठाण, राजाभाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!